आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

वाढदिवसाचे औचित्य साधत केली परिसर स्वच्छता!

कुमार अथर्व दिलीप पठाडे वाढदिवस विशेष!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी ( 20)

केंद्र व राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी स्वच्छता अभियान कार्यक्रमाची फलश्रुती आज सर्वत्र दिसत असून, या स्वच्छता अभियानाचे लोन आता ग्रामीण भागात देखील सर्रास पहावयात मिळत असून ही अतिशय समाधानाची बाब आहे. त्यातच युवा पिढीने आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधत मित्रमंडळींसोबत मौज मस्ती करत पैशाची उधळपट्टी न करता आपला वाढदिवस लक्षात राहणे इतपत स्वच्छता मोहिमेचे काम हातात घेतल्यास ते एक स्तुत्य पाऊल ठरू शकते. असंच काहीसं काम निपाणी नगरपालिकेचे माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेविका अनिता पठाडे यांचे सुपुत्र चिरंजीव अथर्व दिलीप पठाडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत वार्डमधील मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.

दरम्यान,शहर व ग्रामीण परिसरातील स्वच्छतेचे महत्त्व खूप व्यापक आहे, कारण स्वच्छता ही केवळ सौंदर्याचीच बाब नाही, तर ती नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी खूप आवश्यक आहे. शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा आणि उद्याने स्वच्छ ठेवली गेली, तर तेथे राहणाऱ्या आणि येणाऱ्या लोकांचे आरोग्य अबाधित राहते. घाण, कचरा, आणि अस्वच्छता हे विविध रोगांचे मुख्य कारण बनू शकतात. मलेरिया, डेंग्यू, आणि कॉलरा सारखे रोग अस्वच्छतेमुळे पसरू शकतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनतेचे आरोग्य धोक्यात येते. स्वच्छ शहर पर्यावरणासाठीही अत्यंत फायदेशीर असते. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन झाले तर जमिनीचे, पाण्याचे आणि हवेचे प्रदूषण कमी होते, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. याशिवाय, स्वच्छतेमुळे पर्यटक आणि व्यवसायांना आकर्षित करण्यासही मदत होते, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था सुधारते. स्वच्छ शहर हे सामाजिक जबाबदारीचे लक्षण असून, नागरिकांच्या जीवनमानात वाढ घडवून आणते. म्हणूनच शहराच्या स्वच्छतेकडे केवळ नगरपालिका किंवा प्रशासनाची जबाबदारी म्हणून न पाहता प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देणे आवश्यक आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!