आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

ज्येष्ठ रंगकर्मी फुलचंद नागटिळक यांच्या हस्ते साहित्यिक अजित सगरे सन्मानित!

विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती,शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन‌ केला त्यांच्या राहत्या घरी सत्कार!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (21)

येथील  शेतकरी कष्टकऱ्यांच्या चळवळीपासून शिक्षण, सामाजिक क्षेत्रात साहित्यिक अजित सगरे यांनी केलेले काम खूप मोठे आहे. ते सीमा भागातील जनतेला आतापर्यंत समजले नाही. परंतु माढा तालुक्यातील (जि. सोलापूर) समस्त वारकरी सांप्रदायातर्फे निपाणीचे सुपुत्र साहित्यिक अजित सगरे यांना मानाची विठ्ठल रुक्माई मूर्ती, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन, माढा तालुका वारकरी  सांप्रदायाचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे भूषण असलेले ज्येष्ठ रंगकर्मी फुलचंद नागटिळक व सौ. अनिता नागटिळक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा निपाणी परिसर व सीमा भागाच्या दृष्टीने साहित्यिक सगरे यांचा सन्मान म्हणजे सीमा भागाचा सन्मान आहे.” असे गौरवोद्गार या समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व चळवळीचे नेते निरंजन कमते अकोळ यांनी काढले.

यावेळी माढा तालुक्याच्या वतीने फुलचंद नागटिळक यांनी साहित्यिक सगरे यांनी माढा तालुक्यात होणाऱ्या साहित्य संमेलनासह इतर कार्यक्रम व वारकरी संप्रदायासाठी वेळोवेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या ऑनलाइन पद्धतीने माय मराठीच्या केलेल्या सेवेमुळे माढा तालुक्यात सगरे सरांची विशेष छाप आहे. म्हणूनच सगरे सरांची अडचण लक्षात घेऊन माढा तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांच्या निवासस्थानी सन्मानपूर्वक त्यांचा हा गौरव केला. याचा आम्हालाही अभिमान आहे. असे गौरवोद्गार नागटिळक यांनी याप्रसंगी काढले.

याप्रसंगी डॉ. एन डी जत्राटकर, मराठी भाषा तज्ञ प्रा. नानासाहेब जामदार, साहित्यिक कबीर वराळे, निवृत्त मुख्याध्यापक तुकाराम कोळी, ज्येष्ठ सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्ते राजकुमार मिस्त्री, सौरभ गौरव फाउंडेशन चे सुशील कुमार कांबळे, यांनी आपल्या मनोगतातून साहित्यिक सगरे यांच्या विविध क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. तर सत्काराला उत्तर देताना साहित्यिक सगरे यांनी या सन्माना विषयी कृतज्ञता व्यक्त केली. आणि हा सन्मान त्यांनी सीमा भागातील समस्त वारकरी संप्रदाय व समाज कल्याणासाठी चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना अर्पण केला आहे.

या कार्यक्रमाचे स्वागत व पाहुण्यांचा परिचय पर्यावरणवादी कार्यकर्ते बाबासाहेब मगदूम यांनी केला. प्रास्ताविकातून प्रा.नवीजन कांबळे यांनी साहित्यिक अजित सगरे यांच्या कार्याचा आढावा घेतला. तर आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते अनिल हेगडे कुन्नूर यांनी मानले.

या कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब खोत, सौ चंदा कांबळे, मंगल सगरे, भूतपूर्व सैनिक विजय निर्मळे, अजित पाटील कुरली, निपाणी ग्राम दैवत महालक्ष्मी देवस्थान प्रमुख प्रशांत गुंडे, विकास शिंदे, वारकरी रवी इंगवले, सुहास मुचंडी, मधु चव्हाण, दीपक कवाळे, सुनील सटाले चिखलवाळ, अनिल माने, अकबर कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!