ताज्या घडामोडी

लोणावळ्यात घरघुती ३०० पेक्षा जास्त गणपतीचे विसर्जन

नगरपरिषदेच्या विसर्जन हौदाचे उद्घाटन .

 लोणावळा : लोणावळ्यात  सुमारे ५१ सार्वजनिक  व १२०० घरगुती गणपतीचे प्रतिष्ठापना केली असून दीड दिवसांच्या तीनशे गणपतींचे विसर्जन शनिवारी  करण्यात आले. लोणावळा नगरपरिषदेच्या  विसर्जन हौदाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुरेखाताई  नंदकुमार जाधव यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष  श्रीधर पुजारी , मागासवर्गीय कल्याण समिती सभापती  मंदा सोनवणे , नवनिर्वाचित नगरसेवक ललीत सिसोदिया ,  माजी शिक्षण  मंडळ सभापती  विनय विद्वांस , बांधकाम विभाग अधिकारी दत्ताञेय गायकवाड व  कोरोना योध्दा  विजय साळवे  आदी उपस्थित  होते.
नगरपरिषदेच्या  विसर्जन  हौंद व शहरातील विविध ठिकाणी  सुमारे तीनशे  गणपतीचे विसर्जन  करण्यात आल्याचे लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे  पोलिस अधिकारी  श्री.कवडे यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!