ताज्या घडामोडी
ग्रामपंचायत येळसे व शंभुराजे गणेश मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गावात महास्वच्छता अभियान
येळसे : ग्रामपंचायत येळसे व शंभुराजे गणेश मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येळसे गावात महास्वच्छता अभियानाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी गावातील काळूबाई मंदिर ते सरकारी दवाखान्यापर्यंत महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता करण्यात आली.गावातील तरुण तसेच अबाल वृद्धांनी या अभियानात भाग घेतला.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच , गणेश मित्र मंडळ सदस्य , शभूराजें ग्रुपचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.