ताज्या घडामोडी

श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने ओझरमध्ये प्रथमच लेझर शो चे आयोजन

पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शो चे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन

ओझर : श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र येथे गणेश जयंती निमित्त, देवस्थान ट्रस्ट ने प्रथमच श्री क्षेत्र ओझर येथे लेझर फाउंटन शो कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर शो चे उद्घाटन मा अदितीताई तटकरे पर्यटन राज्य मंत्री यांनी ऑनलाइन पद्धतीने केले.

देवदर्शनाबरोबरच भाविकांच्या मनोरंजनासाठी अशा प्रकारचे विविध उपक्रम उपलव्ध झाल्यास या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होवून पर्यटनाला अधिक चालना मिळण्याचा प्रयत्न श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ने केला असल्याचे तटकरे यांनी सांगितले .

पर्यटन मंत्री बोलताना म्हणाल्या श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट साठी भविष्यामध्ये कोणताही निधी कमी पडनार नाही.मी स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व पर्यटन मंत्री  आदित्य ठाकरे साहेब यांच्या समवेत चर्चा करून श्री क्षेत्र ओझर येथे पर्यटन वाढीसाठी सकारात्मक रित्या पर्यटनाचे शाश्वत मॉडेल लवकरच विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

लेजर शो ओझर या ठिकाणी प्रथमच आयोजन करण्यामागचा हेतू देवस्थान ट्रस्ट च्या अध्यक्षांनी बोलताना सागितला. अध्यक्ष म्हणाले . श्री क्षेत्र ओझर मध्ये आलेला भाविक दर्शनाबरोबर या ठिकाणी थांबून त्याला मनोरंजना बरोबर श्री विघ्नहराची पौराणिक कथा , तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देखील उज्वलीत होणार आहे .म्हणून श्री क्षेत्र ओझर येथे अशा पद्धतीचा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने उभा राहिल्यास श्री क्षेत्र ओझरच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे.

फाउंटन शो कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी उपाध्यक्ष अजित कवडे ,सचिव दशरथ मांडे , खजिनदार कैलास घेगडे, ओझर नंबर दोन चा सरपंच तारामती कर्डक विश्वस्त श्री रंगनाथ रवळे ,श्री आनंदराव मांडे, श्री किशोर कवडे, श्री मंगेश मांडे, श्री मिलिंद कवडे, श्री कैलास मांडे, श्री विजय घेगडे , श्री श्रीराम पंडित राजश्री कवडे ग्रामपंचायत सदस्य मोहन कवडे अक्षदा मांडे ,मीरा जगदाळे वर्षा मांडे व देवस्थानचे माजी विश्वस्त बाळासाहेब कवडे विनायक जाधव मोठ्या संख्येने भाविक व गणेशभक्त तसेच ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवस्थान ट्रस्टचे खजिनदार कैलास घेगडे व मंगेश मांडे यांनी केले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!