ताज्या घडामोडी

‘झुंज’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास तळेगावात उद्यापासून प्रारंभ 

निर्मात्यांचे चिञपट रसिकांना चिञीकरणास उपस्थित राहण्याचे आमंञण 

तळेगाव : येथील आई जगदंब फिल्म क्रिएशन या प्रथितयश निर्मिती संस्थेच्या ‘झुंज’ या मराठी व हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ उद्या (12 फेब्रुवारी) रोजी तळेगाव शहरातील तळे परिसर, रणजीतसिंह कॉलनी या ठिकाणी सकाळी 10 वाजता होणार आहे.प्रशांत चंद्रकांत सुर्वे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.आई जगदंब फिल्म क्रिएशन एक नावाजलेली चित्रपट निर्मिती करणारी संस्था आहे.

या निर्मिती संस्थेने यापूर्वीही अनेक प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘झुंज’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या शुभारंभाला तळेगावातील चित्रपट रसिकांनी तसेच नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, नितीन शहा, मा.नगरसेवक गोपाळ परदेशी व प्रॉडक्शन मॅनेजर  झाकीर भाई शेख यांनी केले आहे.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!