ताज्या घडामोडी

श्रीक्षेत्र देहू नगरपंचायत हद्दीतील सुमारे 8 कोटी 55 लक्ष रु.च्या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे Aditi Tatkare यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

श्री क्षेत्र देहू नगरपंचायत हद्दीतील सुमारे 8 कोटी 55 लक्ष रु.च्या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे Aditi Tatkare यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

  • सन २०२१-२२ महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान आणि नागरी दलितेत्तर वस्त्यांमध्ये सुधारणा करणे योजनेअंतर्गत महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून देहुमधील या विकासकामांना सुमारे 8 कोटी 55 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे. नगरपंचायत निवडणुकीत विकासकामांच्या जोरावर राष्ट्रवादीला साथ देण्याची विनंती देहूकरांना केली होती. त्यास प्रतिसाद देत देहूकरांनी भरभरून मतदानरुपी आशीर्वाद देऊन एकहाती सत्ता दिली.देहू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. या विकासकामांचे फक्त भूमिपूजन न करता प्रत्यक्ष कामांना देखील सुरुवात होणार आहे.व पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे पुर्ण करण्यावर भर असणार आहे.

या समारंभ प्रसंगी मावळचे आमदार सुनिल शेळके ,राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष गणेश  खांडगे, श्री क्षेत्र देहु नगरपंचायत मुख्याधिकारी .प्रशांत जाधव, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा .रसिका काळोखे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष .प्रकाश हगवणे, महिला शहराध्यक्षा .रेश्मा मोरे, माजी सभापती .हेमलता काळोखे, नगरसेविका मीना कुऱ्हाडे, .पूजा दिवटे, शीतल हगवणे, प्रियांका मोरे, सपना मोरे, .पुनम काळोखे,.ज्योती टिळेकर, पौर्णिमा परदेशी, नगरसेवक .योगेश परंडवाल,  सुधीर काळोखे, .योगेश काळोखे, .प्रवीण काळोखे, मयूर शिवशरण, मयुर टिळेकर, आनंदा काळोखे, रोहित काळोखे, .कांतीलाल काळोखे, .बाळासाहेब काळोखे, .प्रवीण झेंडे, .वैशाली टिळेकर, आदि.मान्यवर, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!