आमच्या भागात कोणी लक्ष देतील का ?
आमच्या भागात कोणी लक्ष देतील का?
आवाज न्यूज: नक्की नागरिकांनी टॅक्स कशासाठी भरायचा असे आता तर वाटू लागले आहे साधारण तीन-चार वर्षांपासून कडोलकर कॉलनी ते टकले कॉलनी दरम्यानचा हा रस्ता अजूनही दुरुस्तीचे प्रतीक्षेत असताना नागरिकांना दिसतो , लहान मोठे खड्डे बाजूला च तुडुंब भरलेली गटार (कचऱ्याने सांडपाण्याने नाही ! ) त्यामुळे नक्की चालावे कुठून हा प्रश्न अनेकांना पडत असतो याच ठिकाणाहून सह्याद्री शाळेसारख्या नामवंत शाळेतील विद्यार्थी सायकलवर तसेच पायी ये -जा करत असतात , वाढती नागरी वस्ती पाहता जव्हेरी कॉलनी मस्करनीस कॉलनी दोन, टकले कॉलनी या भागातील अनेक नागरिक , महिला वर्ग, लहान मुले याच रस्त्याने गाव भागात ये- जा करत असतात.
तळेगावातील काही कॉलनी भागात अतिशय दर्जेदार असे रस्ते होत असताना मात्र हा भाग दुर्लक्षित आहे की काय अशी शंका तेथील नागरिकांना वाटू लागली आहे कारण या भागात कचऱ्याचे साम्राज्य कित्येक वर्षापासून पाहण्या सारखे असेच आहे शिवाय या भागात कित्येक रात्री ची लाईट ही बंदच असते टाकलेल्या कचऱ्यावर तेथील श्वान इकडे तिकडे फिरून कधी दुचाकी चालकांच्या मागे सुद्धा भुंकताना दिसत आहेत आणि पावसाळ्यात तर अशी अवस्था होते की नक्की रस्ता कोठे आहे हे शोधावे लागते.
नागरिकांच्या समस्या ह्या प्रशासनापर्यंत पोहोचेल का अशी आर्त साद तेथील रहिवासी नागरिक करत आहेत.
-सुरेश शिंदे तळेगाव दाभाडे,मस्करनीस कॉलनी दोन रहिवाशी.