ताज्या घडामोडी

गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांची जबरदस्त कोंबिंग ऑपरेशन..

पुणे पोलीसांची कोंबिंग ऑपरेशन, एसटी स्टँड ते सर्व निर्जन स्थळा सहीत, लाॅज, हाॅटेल रेल्वे स्थानक, ढाबे असे अनेक ठिकाणी छापे, स्थानिक गुंडांमध्ये पळापळ.

पुणे पोलीसांची कोंबिंग ऑपरेशन, एसटी स्टँड ते सर्व निर्जन स्थळा सहीत, लाॅज, हाॅटेल रेल्वे स्थानक, ढाबे असे अनेक ठिकाणी छापे, स्थानिक गुंडांमध्ये पळापळ.

आवाज न्यूज: 30 ऑगष्ट, गणेशोत्सव आलेकी चोर,भुरटे गुन्हेगार, पाकीटमार, सोनसाखळी चोर, मोटरसायकल चोर, असे विविध गुन्हेगार गणपती उत्सव मध्ये फारच गडबड करण्याची भीती असते या गुन्हेगारांवरती नकेल कसण्यासाठी पुणे पोलीस सज्ज झाले आहेत, तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या असे गुन्हेगारांवर ही कारवाई, पोलीसांची करडी नजर आहे. आता पुणे पोलिसांच्यावतीने गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ऑल आऊट कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले.हे ऑपरेशन २७ ऑगस्ट रात्री नऊ ते २८ ऑगस्ट मध्यरात्री दोन वाजेपर्यंत राबविण्यात आले, या मध्ये पोलिसांनी ३ हजार २९५ गुन्हेगारांची तपासणी केली असून ७३८ गुन्हेगारांना अटक केली आहे.यामध्ये हॉटेल, लॉजेस,एस.टी. स्टॅन्ड, रेल्वे स्थानक, निर्जन स्थळे यांची तपासणी करण्यात आली. यात पोलिसांनी आर्म ॲक्ट अतंर्गत एकूण ४२ जणांना अटक केली आहे. यात पोलिसांनी ३५ कोयते, ४ तलवारी व ३ पालघन असा एकूण अकरा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.खंडणी विरोधी पथकाने रेशनिंग व अन्नधान्याचा अवैध साठा करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली असून १७ लाख ४१ हजार ३६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकानेही कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून त्याच्या जवळून ७ हजार ६०० रुपयांचा ३६२ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तसेच गुन्हे शाखा व पोलीस ठाण्यांनी मिळून १७ तडीपार गुंडावरही कारवाई केली आहे. पोलीस नाकाबंदी मध्ये २ हजार २५२ संशयीतांवर कारवाई करून ३४ जणांवर दंडात्मक कारवाई करत ८ हजार ३०० रुपयांचा दंड वसून केला. वाहतूक शाखेनेही १ हजार २४९ वाहनांची तपासणी करून या कालावधीत १ लाख १२ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला.या कोंबींग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी पुणे आयुक्तालयाअंतर्गत येणारे ४९२ हॉटेल, ढाबे व लॉजेस यांची तपासणी केली. तर १४५ एसटी स्टॅन्ड,रेल्वे स्थानके व निर्जन स्थळांची पाहणी केली. यापुढे पोलिसांची संपूर्ण गणेश उत्सवात गुन्हेगारांवर करडी नजर असणार असून नागरिकांनाही पोलिसांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे. आता पुणे पोलीसांनी हे कोंबिग ऑपरेशन सुरू केले आहे तसेच सर्व स्थानिक पोलीसांनी ही कोबिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना स्थानबद्ध करावे असा नागरिकांमध्ये सुर निघत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!