ताज्या घडामोडी

लोणावळ्यात पन्नास सार्वजनिक गणपती मंडळांच्यावतीने वाजत गाजत गणपतीची प्रतिष्ठापना ..

लोणावळ्यात गणरायाचे जल्लोषात स्वागत..

लोणावळ्यात पन्नास सार्वजनिक गणपती मंडळांच्यावतीने वाजत गाजत गणपतीची प्रतिष्ठापना ..

आवाज न्यूजः मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.१ प्रतिनिधी

लोणावळा शहर पोलिसांकडून पंचवीस गृहरक्षकदलाचे जवान , एसआरपीएफची एक प्लॕटून , तसेच शहरातील आणि मुख्यालयातील असे शंभर पर्यत पोलिसांकडून चोख बंदोबस्त आनंत चतुर्थीपर्यत राहणार आहे..

पाच , सात आणि दहा दिवसांचे सुमारे पन्नास गणपतीमधे श्री गणपतीचे मंदिरातील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचे गणपतीची वाजत गाजत प्रतिष्ठापना करण्यात आली. मारूती मंदिरातील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , श्री शिवाजी युवक मिञ मंडळ , श्री नेहरू युवक मिञ मंडळ , भांगरवाडी , तसेच श्री साईनाथ मिञ मंडळ , वावळेचाळीजवळ , भांगरवाडी या सात दहा दिवसांचे श्री गणेशोत्सव मंडळांसह लोणावाळ्यातील मावळचा राजा श्री शिवाजी मिञ मंडळ , श्री श्रीमंत नेहरू मिञ मंडळ , मानाचा पहिला श्री रायवूड गणेश मंडळ , मानाचा दुसरा श्री तण मराठा मंडळ , मानाचा तिसरा श्री रोहिदास तरूण मंडळ , गवळीवाडा येथी श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मानाचा चवथा व वलवण येथील श्री शेतकरी भजनी मंडळ , या मानाच्या पाचव्या गणपतीसह मानाचा सहावा गणपती राणाप्रताप नेताजी तरूण मंडळ , या मंडळांच्यासह तुंगार्ली येथील श्री ओमकार तरूण मंडळ , श्री सिध्दीविनायक गणेशोत्सव मंडळ यांचेकडून गणपतीची वाजतगाजत प्रतिष्ठापना करण्यात आली.

ई वार्ड मधील श्री महाराष्ट्र मातंग समाज , मंडळ , आखिल महात्मा फुले भाजी व फळ विक्रेता गणेशोत्सव मंडळ , तानाजी युवक मिञ मंडळ , मावळा पुतळा चौक , श्री.तुफान मिञ मंडळ , श्री.अष्ठविनायक मिञ मंडळ, प्रियदर्शिनी संकूल येथे असलेल्या मंडळाने प्रतिष्ठापना केली. गावठाण येथे ईरानीचाळीत तसेच टपाल कार्यालयासमोर , तसेच इंद्रायणीनगर येथे श्री इंद्रायणीनगर गणेशोत्सव मंडळ यांनी प्रतिष्ठापना केली..
पाऊस आसूनही मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

श्री महाराष्ट्र मातंगसमाज गणेशोत्सव मंडळ व भाजीमंडईतील श्री महात्मा फुले भाजी व फळे विक्रेता , यांचेतर्फे बुधवारी दुपारी उशिरा ढोलताशा पथकाचे तालात मिरवणूक काढली होती….यावेळी ढोल ताशा पथकांनी पाऊस न जुमानता ढोलताशांच्या दणदणाटात मिरवणूक काढून गणरायाचे स्वागत केले.. नांगरगाव येथे श्री जयहिंद मिञ मांडळ तसेच गवळीवाडा येथील श्री गुरूदत्त मिञ मंडळ तसेच इंदिरानगर येथे बिजेसचा कामगारांचा सार्वजनिक गणपती यांची प्रतिष्ठापना करण्यात आली.

खंडाळा येथे काही सात दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. .

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!