ताज्या घडामोडी

लोनावळा शहरात ६७ लाखांचा सशस्त्र दरोडा 

आवाज न्युज : लोनावळा  शहरातील  प्रधानपार्क सोसायटी येथे डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर गुरुवारी पहाटे १ ते ३ च्या दरम्यान  सशस्त्र दरोडा पडला.

यामध्ये 50 लाख रुपये रोख व 16 लाख 77 हजार 500 रुपये किमतीचे  दागिने असा साधारण 66 लाख 77 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लायडिंगची खिडकी खोलून पाच ते सहा जण धारदार शस्त्रांसह घरात घुसले तर अन्य काही जण घराबाहेर थांबले होते. डॉ. खंडेलवाल यांच्या बेडरुमचा दरवाजा उघडा असल्याने दरोडेखोर थेट घरात घुसले. त्यांनी डॉक्टर व त्यांच्या पत्नी सौ. विजया यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावत हात पाय  बांधत घरातील सर्व रोख रक्‍कम व सोनं असा ऐवज  लुटला. साधारण अर्धा तासाहून अधिक काळ दरोडेखोर घरात होते. यानंतर गच्चीवरून चारद बांधत ते खाली उतरले व पसार झाले.

सदर घटनेची माहिती समजल्यावर  पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पद्माकर घनवट यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. पुढील तपास  पोलीस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!