नगर परिषद विद्युत विभागातील कामगारांना त्वरित पगार दयावा— प्रवक्ता मिलिंद अच्युत
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील विद्युत विभागातील हंगामी कर्मचार्यांना त्वरित पगार देण्यात यावा अशी मागणी जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी लेखी निवेदना द्वारे उपमुख्यधिकारी सुप्रिया शिंदे यांना केली.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विद्युत विभागातील कर्मचार्यांना गेल्या तीन महिन्यांन पासून पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी पगार मिळण्या संदर्भात जनसेवा विकास समितीच्या संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांना साकडे घातले होते.
जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी त्वरित नगर पालिकेत जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली.
नगर परिषदेत विद्युत विभागातील सदर कामाचा ठेकेदार अबान इलेट्रीकल असून भगवान भालेराव यांना सदर काम देण्यात आले आहे.कामाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने भगवान भालेराव यांना लेखी पत्रा द्वारे आगामी काळात काम सुरू ठेवण्या बाबत नगर परिषद प्रशासनाने सूचित केले आहे. भगवान भालेराव यांना नगर परिषदे कडून बिलां बाबत रक्कम प्राप्त न झाल्यामुळे वेतन देणे शक्य नसल्याचे भगवान भालेराव यांनी मिलिंद अच्युत यांना सांगितले.
नगर परिषदेच्या विद्युत विभागात वेताना बाबत अनागोंदी कारभार सुरू असून कागदोपत्री वीस हजार रुपये पगार असून वास्तवात सदर कर्मचार्यांना तेरा हजार रुपये पगार दिला जात आज तर मग सात हजार रुपये कुठे जातात ? याचा खुलासा नगर परिषदेने करावा अशी मागणी मिलिंद अच्युत यांनी केली.
विद्युत विभागातील कर्मचारी बांधव आर्थिक संकटात सापडले असल्याने त्यांना त्वरित पगार द्यावा व पगारातील तुटी बाबत न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी अच्युत यांनी केली.
तळेगावकर नागरिकांच्या कर रुपी कष्टाच्या पैशांचा दुरुपयोग त्वरित थांबवण्यात यावा , विद्युत विभागा बरोबरच पाणी विभाग, अस्थापना विभाग, आरोग्य विभागातील कर्मचारी बांधवांच्या वेताना बाबत व वेतन तुटी बाबत नगर प्रशासनाने त्वरीत दखल घ्यावी . जनसेवा विकास समिती सदर कर्मचारी बांधवांच्या मागे खंबीरपणे उभी राहील असे प्रवक्ता मिलिंद अच्युत यांनी विद्युत विभागातील कर्मचारी वर्गाला आश्वासन दिले .
या प्रसंगी विद्युत कर्मचारी विशाल बनसोडे , प्रशांत शिंदे, यशवंत कांबळे, काशीनाथ कुंभार , प्रकाश गायकवाड आदी कर्मचारी उपस्थित होते