फेब्रुवारीपूर्वी निवडणुका घेण्याचा प्लॅन
दहावी-बारावीच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात परीक्षा सुरु होतात. त्यामुळे निवडणुकीसाठी यंत्रणा कमी पडेल आणि परीक्षा काळात निवडणूक घेतली जात नाही. एप्रिल-मे महिन्यात कडक उन्हाळा असतो. त्यामुळे डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या तीन महिन्यांत सलग निवडणुका घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकराज संपविण्याचे देखील नियोजन निवडणूक आयोगाकडून सुरु असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे.
निवडणुकीचे संभाव्य तीन टप्पे
१) ग्रामपंचायत निवडणूक : २० नोव्हेंबर ते १५ डिसेंबर
२) महापालिका, नगरपालिका : २० डिसेंबर २०२२ ते २५ जानेवारी २०२३
३) जिल्हा परिषद, पंचायत समिती : ३० जानेवारी ते २० फेब्रुवारी