ताज्या घडामोडी

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात धडकणार त्या निमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्ष व नेत्यांची जन जागृती.

सासवड शिवतीर्थ येथून दूचाकी रॅलीची सुरुवात काँग्रेस कमिटीचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात धडकणार त्या निमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्ष व नेत्यांची जन जागृती.

Table of Contents

आवाज न्यूज : देहुरोड प्रतिनिधी, ५ नोव्हेंबर :-

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या सासवड शिवतीर्थ येथून दूचाकी रॅलीची सुरुवात काँग्रेस कमिटीचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आली. सासवड येथून मुंबई पुणे महामार्गाने लोणावळा शहर तसेच, देहूरोड शहरात रॅली  गुरुद्वारा मार्गे मेन बाजारपेठेतील ऐतिहासिक  सुभाष चौकात दुचाकी रॅली चे आगमन झाल्यावर  स्वातंत्र्य सेनानी  नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवस्मारक  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय जगताप आणि देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष ,माजी नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी भारत जोडो यात्रे  समर्थनात मनोगते व्यक्त करण्यात आली व जन जागृती करत काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच म.फुले मंडई, वृंदावन चौक ,अबुशेठ मार्गे , मुंबई पुणे महामार्गाने दुचाकी रॅली देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  रूग्णालयाच्या आवारातील विश्वरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करून, तेथे रॅलीची सांगता करण्यात आली..

या भारत जोडो दुचाकी महारॅलीत महाराष्ट्र  प्रदेश उपाध्यक्ष देविदास भन्साळी पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष व आमदार मा. संजय  जगताप  , पुणे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम दादा मोहोळ, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा किरण काळभोर,पुणे जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष जमिरभाई काझी,पुणे जिल्हा किसान कॉंग्रेस अध्यक्ष . चंद्रकांत सोपान गोरे पाटील, पृथ्वीराज पाटील,मावळ तालुका अध्यक्ष यशवंत मोहळ, लोणावळा शहराध्यक्ष प्रवीण गायकवाड , लोणावळा नगरपालिकेचे नगरसेवक कवितके. प्रांतिक सदस्य दीपक सायसर, मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष गफूर भाई शेख, उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, उपाध्यक्ष शंकर टी जयसिंग,पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा. रानिताई पांडियन,युवती महिला अध्यक्षा कु. अनिता हाजीमलंग मारिमुत्तु, किसान सेल अध्यक्ष संभाजी पिंजण,चंद्रशेखर मारिमुत्तु, देहूरोड शहर अल्पसंख्याक अध्यक्ष मेहबूब गोलंदाज,सह सचिव बबन भगवान टोंम्पे,राकेश सोळंकी,युवा नेते मलिक शेख, युवा नेते आसिफ शेख , रईस शेख ,आकाश रामनारायण, दक्षिण विभागिय अध्यक्ष व्यंकटेश वीरण , मुत्तू अम्मावसी, कुबेन्द्र मारिमुत्तु, एन. एस वाय .अध्यक्ष वर्धाराजन चंद्रशेखर मारीमुत्तू , राजू नारायण गोडसे,तवमनी अम्मवशी,लक्ष्मी नाडार,सिंधू शिरसाठ, तवमनी अम्मवशी तसेच पुणे जिल्ह्य़ातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह देहूरोड  शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते  सहभागी झाले होते .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!