ताज्या घडामोडी

उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने लसीकरण केंद्रांवरील नागरिकांसाठी पाण्याची मोफत सुविधा

पिंपळे सौदागर : येथील महापालिका शाळेत कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. या ठिकाणी लस घेण्यासाठी नागरिकांच्या अगदी सकाळ पासून रांगा लागत आहेत. अनेक नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यांची तहान भागविण्याचे काम उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे.

नागरिकांसाठी लसीकरण केंद्रांवर सीलबंद बाटलीतील पाण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. या वेळी फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे , डॉ.तपसाळकर तसेच लसीकरण केंद्रावरील नर्स व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , उन्नति सोशल फाउंडेशन मधील सभासद व इतर नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या कि, सध्या रोज लसीकरण केंद्रांवर जास्त प्रमाणात गर्दी होत आहे व रोजच जवळ जवळ प्रत्येक लसीकरण केंद्रांवर ३०० टोकन वाटण्यात येतात. नागरिकांनी टोकन घेतल्यानंतरही त्यांना त्यांचा टोकन नंबर येईपर्यंत वाट पाहावी लागते. बराच वेळ थांबावे लागत आहे. त्यात बरेच ज्येष्ठ नागरिक सुद्धा असतात. त्यांना त्रास होऊ नये यासाठी लसीकरण केंद्रावरील प्रत्येक नागरिकांसाठी पिण्याचा पाण्याची सोय हि उन्नति सोशल फाउंडेशन च्या वतीने मोफत करण्यात आली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!