ताज्या घडामोडी
मावळची सुवर्ण कन्या तृप्ती निंबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना धान्याचे वाटप.
तळेगाव: मावळची सुवर्ण कन्या पैलवान थायबाँक्सिक गोल्ड मिडेल विजेती तृप्ती शामराव निंबळे यांनी वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळून पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस, रिक्षा चालक,डाँक्टर, महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना N 95 चे मास्क व मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात आदिवासी बांधवांना धान्य वाटप केले.
यावेळी वारु ब्राम्हणोलीचे सरपंच शाहिदास शिंदे, महाराष्ट्र चाँपियन शामराव निंबळे,उपसरपंच पोपट शिंदे, शिवाजी शिंदे, भरत निंबळे,सदाशिव निंबळे,जिजाबाई निंबळे, निवृत्ती निंबळे, गंगाराम वाघमारे, श्रावण वाघमारे,यावेळी उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत निंबळे यांनी केले व प्रास्ताविक गणेश साठे सर यांनी केले तर आभार शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले.