ताज्या घडामोडी

–कराओके क्लबचा “प्रथम वर्धापनदिन”–

रविवार दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीरंग कला निकेतनच्या वनश्रीनगर येथील सभागृहात वर्धापनदिन सोहळा साजरा होणार आहे..

“कराओके क्लबचा”प्रथम वर्धापनदिन-

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर १४ डिसेंबर.

तळेगावातील श्रीरंग कला निकेतन ही संस्था संगीतक्षेत्रात गेली सदतीस वर्षे अतिशय सुंदर कार्य करीत आहे. संगीतप्रेमींना असलेली चित्रपट संगीत, लाईट म्युझिक ची आवड लक्षात घेऊन संस्थेचे उपाध्यक्ष . राजीव कुमठेकर यांनी गेल्या वर्षी ‘कराओके क्लब’ची स्थापना त्यांच्या घरी केली. त्याला तळेगावकर संगीतप्रेमींनी चांगला प्रतिसाद दिला आणि संगीतप्रेमींचं एक छान कुटुंब तयार झाले.

दर शुक्रवारी सदस्य जमतात. एक कलाकार ठरवलेला असतो, त्याची गाणी सादर करतात. गेल्या वर्षभरात ४६ मैफिली झाल्या. यासह स्व. लतादिदींना सांगितीक आदरांजली, मुकेशजींच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गणेश मोफत वाचनालयात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम असे कार्यक्रमही केले.

संगीताचा आनंद घेणे आणि देणे या साध्या उद्देशाने हे सगळे उत्साहाने एकत्र येतात आणि आता क्लबचा पहिला वर्धापनदिन साजरा होत आहे.

रविवार दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीरंग कला निकेतनच्या वनश्रीनगर येथील सभागृहात वर्धापनदिन सोहळा साजरा होणार आहे. त्या निमित्ताने क्लबचे गायक गायिका सदस्य “पंचरत्न” हा लतादीदी, आशाताई, मो. रफी, किशोरकुमार, मुकेश यांच्या सुमधूर हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्व रसिक श्रोत्यांसाठी विनामूल्य आहे, तरी रसिकांनी गाजलेल्या गीतांचा आस्वाद घेण्यासाठी अवश्य यावे असे संयोजक कळवितात.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!