ताज्या घडामोडी

गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी बजरंगदलाची मावळात निदर्शने

विश्व हिंदु परिषद, बजरंग दलाच्या वतिने गोरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तहसील कार्यालय व पोलिस स्टेशनला निवेदन.

मावळ :गोवंश हत्या बंदी कायद्याची तालुक्यात काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी मावळ तालुक्यातील वडगाव, देहूरोड, तळेगाव, कामशेत, लोणावळा, पवनानगर, परंदवडी, नवलाख उंबरे येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

देशासह महाराष्ट्रातही गोरक्षा बंदी कायदा असताना हा कायदा पायदळी तुडवला जात आहे. गोवंशाच्या चोरीचे प्रमाण वाढत आहे व तस्करी करणारी टोळी पुणे जिल्ह्यात सक्रिय झाली असून काही दिवसांपूर्वी भोसरी येथे घडलेली घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. सगळीकडे दलालांचा सुळसुळाट झाला आहे. स्थानिक मंडळी कसायांच्या भूलथापांना बळी पडत आहे. त्यामुळे हा कायदा पायदळी तुडवणा-या कसाई, दलाल व स्थानिक दलालांवर योग्य ती कारवाई करावी तसेच कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीचे निवेदन पोलिस प्रशासन व तहसीलदारांना देण्यात आले.

यावेळी जिल्हा धर्म प्रचार प्रमुख गोपीचंद कचरे यांनी गोरक्षणाचे महत्त्व विशद केले. बजरंग दल जिल्हा सहसंयोजक बाळासाहेब खांडभोर यांनी घडणाऱ्या घटनांचा तीव्र निषेध करत अशी कृत्य करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची व गोरक्ष कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची मागणी केली.कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी दिला.

यावेळी अमोल पगडे, मोरेश्वर पोपळे, अभिमन्यु शिंदे,अर्जुन शिंदे,शंकर पिंगळे ,सितेज जैन,गोपी शिंदे, नवनाथ मोढवे, महेंद्र असवले, निखिल भांग्रे, गणेश वैद्य , आकाश वारुळे, दत्तात्रय गरुड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!