ताज्या घडामोडी

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या गुन्हेगारांना कोथरूड पोलिसांनी केले जेरबंद

पुणे : दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत गुन्हेगारांना मध्यरात्री २:३०च्या सुमारास कोथरूड पोलिसांनी पाठलाग करत जेरबंद केले आहे.

बल्लूसिंग प्रभुसिंग टाक (राहणार सर्वे नं.११०, रामटेकडी) उजाला सिंग प्रभू सिंग टाक अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर खडकी पोलिस ठाण्यात भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.आरोपींवर विविध पोलिस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.

रात्री गस्तीवर असणार्‍या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलीस उपनिरीक्षक शेळके, बीट मार्शल व रात्र ग्रस्त पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी आरोपींनी पोलिसांवर धारदार हत्यारांनी हल्ला केला. मात्र पोलिसांनी शिताफीने आरोपींचा हल्ला परतवत ,पाठलाग करत सहापैकी दोन आरोपी ताब्यात घेतले.

यावेळी आरोपींकडून दरोड्यासाठी आवश्यक कटावणी, लहान-मोठ्या सू-या एक तवेरा गाडी, दागिने व एक घड्याळ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चतुर्शिंगी येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात रात्रगस्त पथकांसाठी नवीन उपाय योजना लागू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे चोरीची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांमध्ये पथक घटनास्थळी पोहोचले.

मा. सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरूड गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेळके ,सहाय्यक पोलीस फौजदार सांगुर्डे, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस शिपाई सपकाळ, कुंभार, गायकवाड ,मरगळे, बुरले, गजभारे व चालक धादवड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!