ताज्या घडामोडी

पर्यटनस्थळी कोविड निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा- अजित पवार

पुणे : जिल्ह्यातील पर्यटन स्थळी पर्यटक गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी पर्यटन स्थळी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी असे अजित पवार यांनी सांगितले.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजना याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी नियम न पाळणार्‍यावर काटेकोर कारवाई करण्यात यावी , नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय यंत्रणांनी सक्तीने कारवाई करावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले .सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी, सुरक्षित अंतर व मास्कचा वापर या नियमांचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.

विकेंड लॉकडाऊन कायम

सुट्टीच्या निमित्ताने पर्यटनस्थळी आणि तीर्थक्षेत्रावर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे विकेंड लॉकडाऊन शिथिल केला जाणार नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे पालकमंत्री म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!