ताज्या घडामोडी
पंचायत समितीकडून शासनामार्फत मिळणा-या क्रिडा साहित्याचा केला जातोय अयोग्य वापर
वडगाव :पंचायत समिती मावळ यांच्याकडून शासनामार्फत मिळणा-या क्रिडा साहित्याचा गैरवापर केला जात आहे. Jevalin अर्थात भालाफेक मधील भाला या क्रिडा साहित्याचा वापर पंचायत समितीच्या इमारतीमध्ये झाडून घेण्यासाठी होत आहे.याचा निषेध करत तालुक्यातील क्रिडा शिक्षक,मार्गदर्शक व खेळाडू यांच्या वतीने गटविकास अधिका-यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील खेळाडूंना योग्यरित्या क्रिडा साहित्य मिळाले तर तालुक्यातून चांगले खेळाडू घडतील.पण पंचायत समिती मावळचे कर्मचारी क्रिडा साहित्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करत आहेत .हे अयोग्य काम थांबले पाहिजे.शासनामार्फत मावळ तालुक्यातील खेळाडूंना येणारे क्रिडा साहित्य खेळाडूपर्यंत पोहचवा व इतर कामासाठी क्रिडा साहित्याचा वापर करू नये असे निवेदनात म्हटले आहे.