वडगावमध्ये दहावीच्या परीक्षेत दोन शाळांमध्ये मुलींची बाजी
वडगाव : येथील रमेश कुमार साहनी इंग्लिश मीडियम स्कूल व न्यू इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या दोन्ही शाळांमध्ये पहिले तीन क्रमांक मुलींनी पटकविले आहेत.
रमेश कुमार साहनी स्कूलमध्ये श्रुती बो-हाडे हिने ९८.२० वीस टक्के गुण मिळवून प्रथम, जानवी असवले ९६.३० टक्के गुणांसह द्वितीय, तर क्रिशा ओके हिने ९६ टक्के गुण मिळवून तृतीय स्थान मिळवले आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र म्हाळसकर, उपाध्यक्ष सचिन ढोरे, मुख्याध्यापिका टी.एन. साईलक्ष्मी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तर न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सृष्टी जगताप ९६.४० टक्के गुणांसह प्रथम, प्रणाली ठोसर ९४.२० टक्के गुणांसह द्वितीय, तर मुस्कान शेखने ९२ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. शाळेच्या वतीने स्कूल कमिटीचे सदस्य मनोज मोरे, प्राचार्य होळकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.