ताज्या घडामोडी

दहावीच्या परीक्षेत अव्वल ठरलेल्या गौरी भावसारचा शिवसेना परिवाराच्या वतीने सन्मान

लोणावळा : दहावीच्या परीक्षेत ९९ . ८० टक्के गुण मिळवत अव्वल आलेल्या मनशक्ती प्रयोग केंद्रातील गौरी ओम भावसार या विद्यार्थिनीचा (१७ जुलै) रोजी शिवसेना परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.

शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेश शेट्टी व कै. शंकरराव मोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त १९८८ सालापासून शिवसेना परिवार गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करत आहे. यावर्षी व्हिपीएस शाळेतील गौरी भावसार या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले. यासाठी तिचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मनशक्ती केंद्राचे विश्वस्त प्रमोद शिंदे, गजानन केळकर, शिवसेना माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, सरपंच सारिका खांडेभरड ,मा. उपसरपंच संजय खांडेभरड,मारुती खोले, संजय घोंगे, विजय चवरे, ओमकार खराडे, मनशक्ती व्यवस्थापक चेतन वेदक, बापर्डेकर आदी उपस्थित होते.

सकाळच्या सत्रात खंडाळा येथील शिवसेना चौकात धार्मिक कार्यक्रम पार पडला याठिकाणी कैलासवासी उमेश शेट्टी व कैलासवासी शंकरराव मोरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!