लोणावळा ते पवनानगरला जाणाऱ्या मार्गावर चार – पाच ठिकाणी पाणीच पाणी
लोणावळा : लोणावळा ते पवनानगरला जाणाऱ्या मार्गावर औंढे खुर्द गावाजवळ तीन चार ठिकाणी तसेच कुसगाववाडीजवळ पुलामधे पाणी रस्त्यावर आल्याने वाहनचालकांवर कसरत करण्याची वेळ आली.
डोंगरगाव वाडीजवळ तसेच बाळू मानकर यांचे घरासमोर पाण्याचे तळे साचले व पाणी रस्त्यावर वहात होते.पुलाखाली पाण्यासाठी गटारे खोदलेली आपुरी पडून पाण्याचे तळे साचल्याने कसरत करीत वाहनचालकांचा मार्ग काढावा लागत होता. मळवली रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ता खचला ,खड्डे पडल्याने वाहनचालकांवर रस्ता बदलण्यासाठी कसरत करावी लागत होती.लोकांनी कार्लाफाटा मार्गे जा-ये करणे पसंत केले.औंढे पुलावरही खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.तसेच येथे एक मोरी अपुरी आसल्याने रस्त्यावर पाणी वहात हौते.त्यातूनच पर्यटक व ग्रामस्थांनी मार्ग काढणे पसंत केले.
औंढे खुर्द गावात साई चिक्कीचे भट्टी आणि विजय राजिवडे व जगदिश राजिवडे यांचे घरात हॉल कीचनमधे आज सकाळी गटार चोकअप होऊन पाणी शिरले. राजिवडे बंधूंनी ताबडतोब सरपंच व उपसरपंच यांना फोनवरून सांगितले.सरपंच अरूण चव्हाण व उपसरपंच विकास कदम यांनी जेसीबी पाठविला.येथील एका बंगला मालकाकडून गटारात टाकलेल्या मो-या काढून गटार खोल खोदल्यामुळे पाण्याचा निचरा झाला.