आंतर महाविद्यालयीन व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत प्रतिभा महाविद्यालयाचा मिस्टर वाणिज्यम किरण गुरंग
पिंपरीतील एम.यू.सी.सी. महाविद्यालयाची श्रृष्टी हुसे या विद्यार्थ्यांनी मिस वाणिज्यम
चिंचवड – चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजच्या वतीने ऑनलाईन पिंपरी चिंचवड शहरातील वाणिज्य अभ्यासक्रमासी निगडीत आंतर महाविद्यालयीन मिस्टर व मिस वाणिज्यम व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा सामान्यज्ञान, विशेष रुची, शैक्षणिक आदी प्रश्नांचा समावेश असलेल्या चार फेर्या झाल्या. परिक्षक म्हणून विविध विषयातील तज्ञ प्रा. पल्लवी चुग, प्रा. निजी साजन यांनी काम पाहिले.
कोरोना प्रादुर्भावामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. काहींना भविष्याची चिंता, सुप्तइच्छा असतात. त्यांचा शैक्षणिक बुद्धाक्य, सामान्यज्ञान, त्याच्यातील उणीवा, दोष, त्रुटी आदी कोणत्या आहेत. आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा आहे. आज शिक्षण घेणारे विद्यार्थी पदवीधर झाल्यानंतर त्यांना नोकरीसाठी मुलाखत देताना अनेक विद्यार्थ्यांची क्षमता असूनही तारांबळ उडते, त्यांच्यावर मानसिक दडपणही येते. यासाठी पदवी घेण्यापूर्वीच मुलाखतीबाबत संपूर्ण माहिती व्हावी, मुलाखत कशी घेतली जाते, प्रत्यक्ष मुलाखतीच्यावेळी मुलाखत घेणार्यांना प्रभावित कसे करावे. यासाठी प्राध्यापकांच्या बैठकीत शहर पातळीवर स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना डॉ. दीपक शहा यांनी केली होती. त्यावेळी कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा समवेत प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया आदी उपस्थित होते. त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड स्तरावर आंतरमहाविद्यालयीन व्यक्तिमत्व विकास मिस्टर अॅण्ड मिस वाणिज्यम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याला शहरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्पर्धा कार्यक्रमाची प्रस्तावना उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी यांनी केले. संयोजन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. श्रृती गणपुले, समन्वयक प्रा. दिनेश लाहोरी, डॉ. मीनल भंडारी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नव्या दंडवाणी यांनी केले