कामशेत : गुरुवार (दि. २२) दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पवन मावळात वसलेल्या तुंग गावात भूस्खलन होऊन एका घरावर व किराणा मालाच्या दुकानावर दरड कोसळून घर आणि दुकान जमीनदोस्त झाले असले तरी देखील सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ह्या भूस्खलनामुळे तुंग गावाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
तुंग गावात राहत असलेल्या सीताराम गोविंद पाठारे यांच्या घरावर व किराणा मालाच्या दुकानावर सकाळी ११ वाजता दरड कोसळल्याने घर व दुकान जमीनदोस्त होऊन आर्थिक नुकसान झाले आहे. ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा घरातील सगळे माणसं भात शेतीच्या कामासाठी शेतावर गेल्यामुळे ह्या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
सीताराम पाठारे यांच्या घरात सुमारे ११ माणसे राहतात. त्यात चार पुरुष, चार महिला व तीन मुलांचा समावेश आहे. कोविड मुळे शाळा बंद असल्याने पाठारे कुटुंबातील सर्व मुले शेतावर भात शेतीच्या कामासाठी जात असत त्यामुळे जिवीत हानी टळली