ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रिंग रोडची मोजणी करून देणार नाही – माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे

तळेगाव दाभाडे : येथे  मावळ तालुक्यातील प्रस्तावित रिंगरोड बाधित शेतकऱ्यांची माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (२६ जुलै रोजी)  बैठक संपन्न झाली.यावेळी यापुढील काळात शेतकऱ्यांचे प्रश्नाबाबत सरकार योग्य ती भूमिका घेत नाही तो पर्यंत रिंगरोडची मोजणी होवू देणार नसल्याची भूमिका माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी  घेतली.

या सरकारच्या माध्यमातून रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम चालू आहे. सर्व बाधित शेतकऱ्यांमध्ये रिंगरोड बाबत तीव्र नाराजी आहे. प्रस्तावित रिंगरोड बाबत राज्यसरकार व अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून ज्या समस्या शेतकऱ्यांच्या असतील त्यांचे समोर समोर निरसन करावे, कोणत्याही भूलथापांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये व आपली फसवणूक होणार याची नाही दक्षता घ्यावी असे विविध मुद्दे या बैठकीमध्ये घेण्यात आले.

यामध्ये पाचाणे, चांदखेड , परंदवडी, बेबडओहोळ, उर्से वडगाव आंबी, सुदवडी, सुदुंबरे,इंदोरी,वराळे इत्यादी गावातील शेतकरी या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीस शंकरमामा शेलार, भास्करराव म्हाळसकर, ॲड.दिलीप ढमाले, प्रशांतअण्णा ढोरे,प्रदेश किसान मोर्चा संतोष दाभाडे,रवींद्रआप्पा भेगडे,नितीन मराठे,शिवाजीमामा पवार,नाना धामणकर,दत्तोबा गाडे पाटील चंद्रचूड महाराज, विश्वनाथ शेलार, राजेंद्र शहा, तानाजी येवले, संदीप येवले, दीपक जाधव, नंदकुमार येवले,नगरसेवक प्रसाद पिंगळे,वसंतराव भिलारे,अरुण वाघमारे,भूषण मुथा आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!