ताज्या घडामोडी

कामशेत मधील 13 पोलिस कर्मचार्‍यांची नियमानूसार बदली

कामशेत:  2017 साली कामशेत पोलिस चौकीचे कामशेत पोलिस ठाण्यात रूपांतर झाले. याला 5 वर्षे पुर्ण झाली.कामशेत पोलिस ठाण्यात मागील 5 वर्षांपासूम सलग नित्यनेमाने काम करत असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांचे नियमानूसार बदली करण्यात आली आहे. 2017 साली पोलिस ठाण्यात रूपांतर झाल्यापासून मागील 5 वर्षात चर्चेचे व सर्वात कमी मनूष्यबळ असलेले पोलिस स्टेशन म्हणून तालुक्यात ख्याती आहे.

पेालिस ठाण्यात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने या पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांवर नेहमी कामाचा कमी अधिक ताण येत होता. पोलिस पाटील व ग्राम सुरक्षा दलातील युवकांना घेऊन हे पोलिस ठाणे सतत काम करत होते.यामुळे त्यांच्या बदलीच्या वेळी पोलिस पाटील व ग्राम सुरक्षा दल अत्यंत भावूक झाले होते.

कामशेत पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक फौजदार मच्छींद्र मागते यांची लोणावळा शहर पोलिस ठाणे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय खंडागळे यांची पुणे ग्रामिण नियंत्रण कक्ष, पोलिस हवालदार हनूमंत वाघमारे व अजय दरेकर यांची लोणावळा ग्रामीण पेालिस ठाणे, मनोज लोखंडे यांची पौड पोलिस ठाणे ,शिवाजी सस्ते व बाळकृष्ण भोर्इर यांची खेड पोलिस ठाणे, वैभव सकपाळ व महेंद्र वाळूंजकर याची लोणावळा ग्रामीण, पोलिस नार्इक रामचंद्र कानगुडे यांची बारामती पोलिस ठाणे, उमाजी मुंढे यांची वडगाव मावळ पोलिस ठाणे, विराज कामठे व राम चव्हाण यांची पौड पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!