पिंपळे सौदागर प्रभागात पावसाळ्यात चालू असलेले खोदाई काम त्वरित बंद करा : नाना काटे
पिंपळे सौदागरमध्ये विविध कामासाठी संपूर्ण रस्ते खोदून ठेवलेले आहेत. खोद्लेलेया रस्त्यांचे काम देखील संथ
गतीने सुरु असून सर्व रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत. सध्या पावसाळा चालू आहे. पाऊस झाला की खोदकामामुळे
संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य तयार होते. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी, व चालताना नाहक त्रास होते
आहे. तरी ही बाब विचारात घेता पावसाळा चालू झाला असून महानगरपालिका नियमाप्रमाणे जून ते ऑक्टोबर
या चार महिन्यांमध्ये कसल्याही प्रकारचे खोदकाम करता येत नाही. तरी स्मार्ट सिटी ने नेमलेल्या बी.जी. शिर्के
कंपनी यांनी सीवर लाईन, किवां अन्य कारणास्तव पिंपळे सौदागर मधील रस्ते खोदाईचे काम चालू केले आहे. ते
त्वरित थांबवावे व अपूर्ण रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात याव्यात. असे नाना
काटे यांनी म्हटले आहे.