ताज्या घडामोडी

निरामय जीवन शैलीसाठी पर्यावरण रक्षण आवश्यक…..सचिन साठे

जागतिक पर्यावरणदिनानिमित्त वृक्ष लागवड, सामाजिक संस्थेला अन्नदान

मानवाच्या निरामय जीवन शैलीसाठी पर्यावरण रक्षण आवश्यक आहे. पर्यावरणाचा संबंध थेट मानवी जीवनाशी आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आधुनिकतेच्या नावाखाली मानवाकडून वसुंधरेचा -हास होत आहे. वृक्ष लागवड करुन आणि त्यांचे जतन, संवर्धन करुन आपण काही अशी वसुंधरेचे रक्षण करु शकतो. यासाठी सरकार बरोबरच सामाजिक संस्था, औद्योगिक आस्थापनांसह सामाजिक कार्यकर्त्यांनीही खारीचा वाटा उचलला पाहिजे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.


5 जून जागतिक पर्यावरणदिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते यमुनानगर येथील धर्मवीर संभाजी महाराज क्रिडा संकुल येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पिंपरीतील रियल लाईफ रियल पीपल या संस्थेच्या सावली निवारा केंद्रात किराणा माल देण्यात आला. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, कॉंग्रेसचे पर्यावरण विभाग महाराष्ट्र सरचिटणीस अमर नाणेकर, महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, रियल लाईफ रियल पीपलचे संचालक एम. ए. हुसेन, प्रदेश अल्पसंख्यांक पदाधिकारी राजेंद्रसिंह वालिया, ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, बाळासाहेब साळुंके, परशूराम गुंजाळ, युवक प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सज्जी वर्की, लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल, गौरव चौधरी तसेच चंद्रशेखर जाधव, मकरध्वज यादव, संदेश बोर्डे, हिरामण खवळे, विशाल कसबे, बाबा बनसोडे, वसिम शेख, जिफीन जॉन्सन, शैलेश अनंतराव, कुंदन कसबे, शारदा मुंडे, सुभाष भुषणे, विश्वनाथ खंडाळे आदी उपस्थित होते.

Advt

सचिन साठे पुढे म्हणाले की, आज जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतोय. वसुंधरेची चिंता असलेले, त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून आजचा दिवस हा उत्साहाने साजरा केला जातोय.
विकासाच्या नावाखाली अमाप वृक्षतोड करुन जंगले उध्दवस्त केली जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस जागतिक तापमानात वाढ होऊन प्रदुषणाची समस्या वाढत आहे. प्रदुषित शहरांच्या यादित मुंबईचा पंधरावा क्रमांक आहे. या वायू प्रदुषणामुळे दरवर्षी आठ हजार मुंबईकरांचा मृत्यू होत आहे. अशी जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नोंद आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये प्रदुषणकारी वायूंचे उत्सर्जन वाढत आहे. यामध्ये भारताचा पाचवा क्रमांक आहे. हे रोखण्यासाठी वृक्ष लागवड व हरीत क्षेत्रात वाढ केली पाहिजे. यासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घ्यावा असेही आवाहन सचिन साठे यांनी यावेळी केले.
स्वागत एम. ए. हुसेन, सुत्रसंचालन मयूर जयस्वाल आणि आभार चंद्रशेखर जाधव यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!