ताज्या घडामोडी

टी. ई. टी. परीक्षेची तारीख बदलण्याची विद्यार्थी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी – दत्तात्रय फडतरे

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टी. ई. टी. परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा देखील आहे. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा असल्याने दोन्ही परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थी साठी हे गैरसोयीचे ठरणार आहे. त्यामुळे टीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी विद्यार्थी संघटनेच्या वतीने दत्तात्रय फडतरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

टी. ई. टी. परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात यावा,अशा सूचना राज्य शासनाच्या शिक्षण विभागाला करण्यात याव्या. नवीन वेळापत्रक तातडीने प्रसिद्ध करण्यात यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!