ताज्या घडामोडी

‘तळेगाव दाभाडे इतिहास ते वर्तमान’ या ग्रंथाच्या सुधारित आवृत्तीचे कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते प्रकाशन

तळेगाव : येथे तळेगाव दाभाडे इतिहास ते वर्तमान या ग्रंथाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते झाले.

तळेगावातील दाभाडे घराण्याचा इतिहास विविध जाती-जमातींची माहिती, उद्योग, शिक्षण, कृषी, सांस्कृतिक क्षेत्र व अन्य विषयांची माहिती समाविष्ट असणारा हा सुमारे ७०० पानांचा ग्रंथ आहे.या ग्रंथाच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते मे २०१९ मध्ये झाले होते.

माजी आमदार भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या ग्रंथाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!