ताज्या घडामोडी

डी- मार्टच्या नावाने वायरल होणारा मेसेज खरा की खोटा?

तळेगाव : सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. आपणही त्याची शहानिशा न करता पुढे शेअर करत असतो. सध्या डी- मार्टच्या नावाने असाच एक मेसेज व्हाट्सअप वर व्हायरल होत आहे.

डी – मार्ट आपल्या विसाव्या वाढदिवसानिमित्ताने मोफत भेटवस्तू देत असून हा मेसेज आपल्या मित्रांना शेअर करा अशा आशयाची पोस्ट सध्या व्हाट्सअप वर चांगलीच व्हायरल होत आहे. हा मेसेज पूर्णत: फसवा आहे.

डी -मार्ट ची स्थापना सन 2002 साली झाली आहे. त्यानुसार या वर्षी डी – मार्टला 19 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही लिंक, मेसेज फॉरवर्ड करताना व्हाट्सअप वापरकर्त्यानी जागरूक राहणे ही काळाची गरज आहे.

सायबर गुन्हेगार तुमची खाजगी माहिती मिळवण्यासाठी नेहमीच नवनवीन शकला, युक्त्या अवलंबत असतात. खाजगी माहिती मिळवून त्याद्वारे बँक अकाऊंट रिकामे केल्याचे अनेक दाखले आहेत. सध्या व्हायरल होणारा मेसेज हा याच प्रकारचा असून त्याव्दारे तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियावरील मेसेजची खातरजमा केल्याशिवाय कुठलाही मेसेज सुज्ञ नागरिकांनी फॉरवर्ड करू नये.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!