ताज्या घडामोडी

डिसेंबरमध्ये निवडणुकांची शक्यता : इच्छूकांची मोर्चेबांधणी सुरू

मावळ : राज्य निवडणुक आयोगाने नगरपरिषद, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्यामुळे डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी इच्छूक कामाला लागले असून काहींनी आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

तळेगाव, लोणावळा आणि आळंदी या नगरपरिषदेच्या विद्यमान सदस्यांची मुदत डिसेंबरअखेर संपणार आहे. देहूमध्ये नव्याने नगरपरिषद अस्तित्वात आली आहे. या नगरपरिषदेतील इच्छुकांसह, हौसे, नवसे आता निवडणुकीसाठी रणनीती ठरवत तयारीला लागले आहेत. काही जणांनी संपर्क कार्यालय उभारत जनतेशी संपर्क वाढवला आहे. तर काही इच्छुकांनी नागरिकांचे मोफत कोरोना लसीकरण करण्यास सुरवात केली आहे.कोरोना काळात दुर्लक्षित असणा-या काही घटकांना आत्ता अन्नधान्य ,जीवनावश्यक वस्तूंचे वाटप काहींनी सुरू केले आहे.एकूणच सर्वत्र जोरदार तयारी सुरु असून लवकरच निवडणुकांचे वारे वाहू लागतील.

लोणावळा व तळेगाव या दोन्ही नगरपरिषदेत भाजपची सत्ता आहे. विद्यमान नगराध्यक्षा भाजपच्या आहेत. मावळ तालुक्यातही गेली पंचवीस वर्षे भाजपची सत्ता होती. मात्र गेल्यावर्षी तालुक्यात सत्तापालट झाली आहे. त्यामुळे यावर्षी नगरपरिषद निवडणुकांमध्ये रंगत येणार आहे.भाजप आपला गड राखणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!