ताज्या घडामोडी
देवघर येथे मोफत केक प्रशिक्षण शिबिर
देवघर : भाजपा महिला आघाडी मावळ यांच्या वतीने देवघर येथे भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सायलीताई बोत्रे यांच्या वतीने व सीमाताई आहेर यांच्या नियोजनाखाली या केकचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. केक प्रशिक्षणाला महिलावर्गाने मोठ्या प्रमाणात उस्फुर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला भाजपा महिला अध्यक्ष सायलीताई बोत्रे ,नाणे मावळ अध्यक्षा सीमाताई आहेर, कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भाऊ भेगडे ,उपसरपंच देवघर गणेशभाऊ देशमुख ,उपाध्यक्ष किसान आघाडी सदाशिवभाऊ देशमुख ,उपाध्यक्ष कामगार आघाडी किसनभाऊ जयवंत येवले, नाणे मावळ किसान मोर्चा अध्यक्ष किसनभाऊ येवले, ग्रामपंचायत सदस्य बाळूभाऊ शिंदे , प्रशिक्षक मोहिनीताई माने यांच्यासह देवघर मधील महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.