ताज्या घडामोडी

भविष्यातील आदर्श पिढी घडवण्याचे काम शिक्षकांचे – संतोष खांडगे

शिक्षक आपल्या दारी" उपक्रम राबवण्याचे शिक्षकांना आहवान

कार्ला :  विद्यार्थ्यांच्या जडण घडण घडवण्यात व आदर्श व्यक्तिमत्व तयार करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते तसेच शिक्षक हा ज्ञानदानाचे काम करत भविष्यातील आदर्श पिढी घडवण्याचा व विद्यार्थ्यांंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षक प्रयत्न करत असतात असे मत नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी केले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधत तळेगाव येथील नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या वतिने संस्थेतील सर्व शाळां व काॕलेजमध्ये जाऊन तेथील ज्ञानदानाचे काम करत असलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यावेळी संतोष खांडगे बोलत होते.यावेळी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, संस्थेचे संचालक व एकविरा विद्या मंदिर शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे,नवीन समर्थ विद्यालय शालेय समिती अध्यक्ष महेशभाई शहा उपस्थित होते.

पुढे बोलताना संतोष खांडगे म्हणाले जसा आपण ‘संस्था आपल्या दारी’ उपक्रम राबवत आहे त्याप्रमाणे कोरोना प्रादूर्भावामुळे शाळा बंद आहे यासाठी शिक्षकांनी देखील वाड्या वस्त्यांवर जाऊन ‘शिक्षक आपल्या दारी ‘उपक्रम राबवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे व त्यांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आहवान शिक्षकांना केले.

यावेळी संस्थेतील सर्व शाळा व ज्युनियर काॕलेजमध्ये ज्ञानदानाचे काम करणारे प्राचार्य,मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!