तळेगाव भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक यांची जयंती साजरी
तळेगाव दाभाडे : भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहर ओबीसी मोर्चाच्या वतीने मंगळवार (दि.7 सप्टेंबर) रोजी आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांच्या २३० व्या जयंतीनिमित्त श्रीगणेश मंदिर (जय बजरंग तरुण मंडळ) येथे प्रतिमापूजन आणि खंडोबाची तळी भरुन अभिवादन करण्यात आले.
प्रतिमापूजन झाल्यानंतर शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,सरचिटणीस शोभाताई परदेशी,भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीन भगवान पोटे यांनी आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांच्या कार्याचा गौरव आपल्या मनोगतामधून केला.
यावेळी शोभाअरुण भेगडे,महिला मोर्चा प्रसिद्धीप्रमुख सोनाली शेलार,भाजयुमो सोशल मिडीया प्रमुख विशाल जव्हेरी यांच्यासह रामवंशी समाजातील बाळासाहेब गुडगूल (मावळ उपाध्यक्ष),सुशील चुकाटे,ज्ञानेश्वर चुकाटे,भिमा चुकाटे,.धीरज शितोळे,शेखर खोमणे,.रविंद्र माकर,गिरीष चव्हाण,जालिंदर चव्हाण,तुषार मंडले,राकेश शितोळे,नागेश धनवटे,गोपीनाथ शितोळे,दिपक राठोड,ओंकार गुडगुल,आदित्य चुकाटे,संदिप चुकाटे,सोमनाथ चुकाटे.बाळासाहेब जाधव,मीना गूडगुल,राणी चुकाटे,.पूजा चुकाटे हे उपस्थित होते.