ताज्या घडामोडी

डॉ. शाळीग्राम भंडारी यांचे पुस्तके व रुग्ण उपयोगी साहित्य जमा करण्याचे आवाहन

तळेगाव : लायन्स क्लबच्या वतीने डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी मावळ व परिसरातील नागरिकांना वाचनालयासाठी पुस्तके व रुग्णांसाठी उपयोगी साहित्य जमा करण्याचे आवाहन केले आहे.

लायन्सक्लब तळेगावने दोन प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पाचे डॉक्टर शाळीग्राम भंडारी हे प्रकल्प प्रमुख आहेत.

क्लबच्या वतीने ग्रामीण भागातील शाळेच्या सहकार्याने विद्यार्थी व नागरिकांसाठी चांदखेड येथे वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सुस्थितीतील पुस्तके भंडारी हॉस्पिटल मध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत आणून द्यावीत. तसेच स्वतः आपले मित्र परिवार किंवा नातेवाईक यांनी हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज घेतल्यानंतर वापरत नसणारे सर्जिकल बेड, व्हिलचेअर, वॉकर, युरीनपॉट,बेडप्यान कडोलकर कॉलनी स्थित लायन्सक्लब हेल्थ क्लब मध्ये जमा करावीत असे आवाहन डॉक्टर भंडारी यांनी केले आहे.

या दोन्ही प्रकल्पात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. सामाजिक बांधिलकी जपत या साहित्याचा आर्थिक दृष्ट्या दुर्बल रूग्णांसाठी वापर करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांचा गरजू विद्यार्थी तसेच रुग्णांना लाभ होणार आहे असे डॉ. भंडारी यांनी सांगितले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!