ताज्या घडामोडी
घटस्थापनेपासून मंदिरे उघडणार असल्याने कार्लाच्या श्री एकविरा देवीच्या भाविक भक्तांमधे आनंदाचे वातावरण
लोणावळा : कार्लाच्या श्री एकविरा देवीच्या मंदिरासह राज्यातील सर्व धार्मिक स्थळे ता.७ रोजी नवराञौत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून घटस्थापनेपासून सुरू होणार असल्यामुळे भाविक भक्त व दुकानदारांनी, ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
राज्य सरकारने उशीरा का होईना पण चांगला निर्णय घेतला.श्री.एकविरा देवीचे मंदीर व राज्यातील मंदिरे सरकारने खुली केली. मागील दीड वर्षापेक्षा अधिक काळ मंदिर परिसरात दुकानेबंद आहेत. लोकांवर उपासमारीची वेळ येवू देवू नका ! अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका व पुणे जिल्हा यांच्या वतीने काही दिवसांपूर्वी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.
सरकारने मंदिरांची कवाडे उघडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करत आनंद व्यक्त केला.