ताज्या घडामोडी

पंचायत समितीच्या इमारतीमध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्यांसाठी बैठक कक्षाची सुविधा करावी

अखिल भारतीय सरपंच परिषदेचे निवेदन

वडगाव : येथील मावळ पंचायत समितीच्या इमारतीमध्ये सरपंच,उपसरपंच व सदस्यांना बसण्यासाठी बैठक घेण्याची सुविधा करावी अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पंचायत समितीतील अधिकारी त्यांच्या कार्यालयात असतात. मात्र जनतेच्या कामासाठी पंचायत समितीत येणार्‍या लोकप्रतिनिधींना मात्र रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी बैठक कक्षाची मागणी सरपंच परिषदेने केली आहे.

याप्रसंगी सरपंच परिषदेचे पदाधिकारी भिकाजी भागवत, समीर कदम, गोपाल पवळे, दिगंबर आगिवले, शरद जाधव, मनोज येवले, सोपान सावंत, योगेश राक्षे, दिनेश चव्हाण, मोहन घोलप, बळीराम भोईरकर आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!