ताज्या घडामोडी
आता मोदी सरकार देणार डिजिटल हेल्थ कार्ड
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार पासून आयुष्मान भारत डिजिटल मिशनची सुरुवात केली आहे. या अंतर्गत आता भारतीय नागरिकांना एक डिजिटल हेल्थ आयडी दिला जाणार आहे.
नागरिकांना एक डिजिटल हेल्थ कार्ड दिले जाणार आहे. या कार्डमध्ये नागरिकांच्या आजारासंबंधी, उपचाराविषयी तसेच मेडिकल टेस्ट संदर्भातील माहिती असणार आहे, हे एक युनिक आयडी कार्ड असेल.