ताज्या घडामोडी

शिवदुर्ग मित्र क्लायबिंगने ‘शोशाल पीक शिखर’ केले सर

लोणावळा : शिवदुर्ग मित्र क्लायंबिंग टीमने सलग बारा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर हिमाचल प्रदेशातील ‘शोशाला पिक शिखर’ सर केले आहे.

शिवदुर्ग मित्र क्लायबिंग टीमने हिमाचल प्रदेशातील रक्षम गावातील बास्पा व्हॅलीमधील शोशाला पीक क्लायंबिंग मोहीम आखली होती. हिमालयातील शिवदुर्ग मित्रची ही पहिलीच मोहीम होती.

शोशाला पीक हे शिखर समुद्रसपाटीपासून 4700 मीटर असून त्याची उंची 750 मीटर आहे. यापूर्वी भारतातील कोणीही हे शिखर सर केले नव्हते. सलग बारा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर शिवदुर्ग टीमच्या क्लायंबर्सनी मोहीम फत्ते केली.

शिवदुर्ग मित्रचे सचिन गायकवाड, अॅड. संजय वांद्रे, सुनील गायकवाड, अशोक मते, राजेंद्र कडू, आनंद गावडे, महेश मसने, गणेश गीद यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पाडण्यात आली.

या मोहिमेत क्लायबिंग सदस्य रोहित वर्तक, भुपेश पाटील, योगेश उंबरे, ओंकर पडवळ, समिर जोशी, शिवम आहेर यांनी भाग घेतला.मोहिमेसाठी Red bull India आणि Go – pro india यांनी विशेष सहकार्य केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!