ताज्या घडामोडी

मळवली बोरज रस्ता दोनशे मीटर कॉक्रीटीकरण ; बाकी रस्ता खड्डेमय

लोणावळा :  मळवली ते बोरज व ताजे गावाकडे जाणारा रस्ता दोनशे मीटर काँक्रीटीकरण , शंभर मीटर डांबरीकरणाचा असून सुमारे दोन किलोमीटर रस्ता खड्यांमुळे रस्ताच राहिलेला नसल्यामुळे वाहनचालकांना ञास सहन करावा लागत आहे.

अत्यंत वर्दळीचा असलेला हा रस्ता खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करीतच या रस्त्याने रोज जा – ये करावी लागत आहे. अभिनव सोसायटी , मुंबई टपाल कर्मचारी सोसायटी आदी अनेक निवासी सोसायटी व खाजगी बंगलेवाले या भागात सतत जा – ये करतात.

पाटण, बोरज ग्रामपंचायतीच्यावतीने या रस्त्याकरीता ठोस पावले उचलावीत , आमदार , जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्य यांचेकडे पाठपुरावा करून पूर्ण रस्ताच काँक्रीटीकरण करून घ्यावा , या भागातील बंगलेवाले तसेच घरकुलमालक यांचेकडून घरपट्टी , पाणीपटी वसुली केली जात असून पाटण बोरज ग्रामापंचायत माञ या रस्त्याच्या खड्ड्यांकडे दूर्लक्ष करीत आहे ,असे वाहनचालक यांचे म्हणणे आहे.

दुग्धव्यवसायिक , शालेय विद्यार्थी , कामगार आणि महिला तसेच शेतकरी यांना या रस्त्याने जाण्यशिवाय पर्यायच राहिला नाही; कारण मुंबई पुणे द्रूतगतीमार्गाच्या बाजूला असलेले सर्वीस रस्ते गेले वीस वर्षे तसेच चिखलमय राहिले आहेत ,त्यावर खडी व डांबरीकरणाचा थर आणखी किती वर्षे पडणार नाही ,  अनेक सरकारे आली आणि गेली पण राज्यसरकारने मनावर घेतलेले नाही. किमान महाविकास आघाडीचे सरकार तरी लक्ष देईल का ? असा प्रश्न पाटण बोरज , ताजे मळवली ग्रामस्थ विचारीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!