1 ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळीसाठी पुन्हा मोजावे लागणार 10 रुपये
मुंबई : कोरोना महामारीच्या काळात मजूर, कामगार व गरीब वर्गाला दिलासा देण्यासाठी शिवभोजन थाळी मोफत दिली जात होती.परंतु आता 1 ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळीसाठी पुन्हा 10 रुपये मोजावे लागणार आहेत. 30 सप्टेंबर पर्यंत ही थाळी मोफत दिली जाणार आहे.
राज्यात टप्याटप्याने कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने राज्य सरकारने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय रद्द केला आहे.
15 एप्रिल 2021 पासून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना प्रतिदिन 2 लाख मोफत भोजन थाळी देण्यात येत आहे. 1 ऑक्टोबरपासून शिवभोजन केंद्रांना दररोज दीडपट थाळी वाटपाचे उद्दिष्ट आता राहणार नाही. तसेच केंद्रांवर पार्सलची सुविधा उपलब्ध असणार नाही. ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळीसाठी पुन्हा 10 रुपये मोजावे लागणार आहेत.