ताज्या घडामोडी

पवना,आंद्रा धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत मंत्रालयात बैठक संपन्न

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील पवना,आंद्रा धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत बैठक मंत्रालयातील समिती कक्षात संपन्न झाली.

पवना धरण प्रकल्पबाधित शेतकऱ्यांपैकी उर्वरित 863 शेतकऱ्यांचे पुनर्वसन करणे, पवना बंद जलवाहिनी विरोध आंदोलनातील गोळीबारात जखमी झालेल्या 12 जखमी शेतकऱ्यांना पिं.चिं. महानगरपालिकेत नोकरी देणे, शिरे-शेटेवाडी प्रकल्पग्रस्तांचे दाखले देणे व पुनर्वसन वसाहतीमध्ये मूलभूत सोयी-सुविधा पुरवणे या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबतची सविस्तर माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना बैठकीत देण्यात आले आहेत.

यावेळी आमदार सुनिल आण्णा शेळके,ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम कारखाना संचालक सुभाष जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका युवक अध्यक्ष,सुनिल दाभाडे, स्थानिक शेतकरी प्रतिनिधी, शेतकरी नेते रविकांत रसाळ, मुकुंदराज काहूर,बाळासाहेब मोहोळ, बाळासाहेब काळे, शांताराम लष्करी,विलास मालपोटे, रवि ठाकर,पांडुरंग मोढवे, दत्तात्रय ठाकर, सुरेश कालेकर, मारुती दळवी, धरणग्रस्त संयुक्त समिती पदाधिकारी, सदस्य व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!