ताज्या घडामोडी

कार्ल्यात मावळ पंचायत समिती व सेव द चिल्ड्रेन या संस्थेच्या वतीने आदिवासी बांधवांना अन्नधान्य किट वाटप

कार्ला : मावळ पंचायत समिती व सेव द चिल्ड्रेन या संस्थेच्या वतीने कार्ला येथील आदिवासी बांधवांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.

मागील दिड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे आदिवासी बांधवांनाही कोरोना महामारीचा सामना करावा लागत आहे. हाताला काही काम नसल्याने त्यांना आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करत असताना गेल्या दिड वर्षापासून मोठी कसरत करावी लागत आहे. त्यांच्या या परीस्थितीचा विचार करून मावळ पंचायत समिती व सेव द चिल्ड्रेन या संस्थेच्या वतीने कार्ला येथील आदिवासी बांधवांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.

मावळ पंचायत समितीच्या सभापती ज्योती शिंदे,मावळ भाजपा महीला अध्यक्षा सायली बोत्रे,माजी सरपंच प्रदीप हुलावळे,माजी सदस्य भाऊसाहेब हुलावळे,कार्ला ग्रामपंचायत सरपंच दिपाली हुलावळे,ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे, ग्रामपंचायत सदस्या वत्सला हुलावळे,सोनाली हुलावळे,भारती मोरे,अजय भवार,पोलीस पाटील संजय जाधव,ग्रामसेवक सुभाष धोञे,अंगणवाडी सेविका कुंदा हुलावळे,भाजप वाकसई गण अध्यक्ष सचिन येवले,सोशल मिडीया अध्यक्ष सागर शिंदे,संस्थेचे बीट प्रमुख गोविंद हजारे,अशोक धडस, प्रज्वल हुलावळे,किरण गायकवाड,विशाल रसाळ,इत्यादी सह आदिवासी बांधव उपस्थित होते.

यावेळी मावळ पंचायत समितीच्या सभापती ज्योती शिंदे, सायली बोत्रे व सचिन येवले यांनी सर्व आदिवासी बांधवांनी मनात कुठलाही गैरसमज न ठेवता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले .तर गोविंद हजारे यांनी पुढील काळातही संस्था आदिवासी बांधवांना मदत करेल सांगितले. कार्येक्रमाचे सुत्रसंचालन भाऊसाहेब हुलावळे यांनी केले. तर आभार आदिवासी भगिनी गौरी पवार यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!