ताज्या घडामोडी
भटकंती सह्याद्री ट्रेकर्सच्या वतीने किल्ले विसापूरवर स्वच्छता मोहीम
मळवली : मावळ तालुक्यातील विसापूर गडावर भटकंती सह्याद्री ट्रेकर्स मावळ ग्रुपने स्वच्छता मोहिम राबविली.
या मोहिमेअंतर्गत गडावरील हनुमान मूर्ती समोरील टाक्या, पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकचा कचरा, रॅपर असा कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली.
गडावर येणाऱ्या पर्यटकांनी स्वच्छता राखी पाहिजे. गड-किल्ले हे आपले वैभव आहे याचे भान ठेवावे असे आवाहन ट्रेकर्सच्या ग्रुपने केले.