ताज्या घडामोडी

विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी मावळ यांच्यावतीने दुर्गामाता दौडचे आयोजन

तळेगाव : मागील पंधरा वर्षापासून मावळातील तळेगाव, कामशेट, वडगाव, नाणे, थोरण, टाकवे, लोणावळा अशा अनेक गावांमध्ये नवरात्रीमध्ये दुर्गामाता दौडचे आयोजन करून आदिमाया आदिशक्तीचा जागर केला जातो.

भल्या पहाटे एका मंदिरापासून दुसर्‍या मंदिरापर्यंत देव-देवतांच्या, राष्ट्रपुरुषांच्या, क्रांतिकारकांच्या नावाचा जयघोष करत दौड काढली जाते. मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी यात सहभागी होतात.

तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती, देशप्रेम जागृत करणे तसेच सूर्यनमस्कार, व्यायामाचे महत्त्व, लवकर उठण्याचे फायदे यावेळी सांगितले जातात. या राष्ट्रयज्ञात मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन विभाग संयोजक बजरंग दल संदेश भेगडे यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!