ताज्या घडामोडी

खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात वडगाव मावळ कोर्टाचे चौकशीचे आदेश

प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप

तळेगाव : खासदार श्रीरंग बारणे यांनी सन 2019 च्या मावळ लोकसभा निवडणुकीसाठी प्रतिज्ञापत्र सादर केले. नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने सदर माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली.

या प्रतिज्ञापत्रात बारणे यांनी निगडी पो.स्टे.गुन्हा क्र. 3271/2013 हा लपवला तसेच सन 2009 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी 1980 मध्ये दहावी अनुत्तीर्ण झाल्याचे नमूद केले होते. मात्र सन 2019 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी दहावी 1989 मध्ये झाल्याचे नमूद केले आहे.

त्यामुळे फिर्यादी अनिल भांगरे व डॉ. अभिषेक हरिदास यांनी वडगाव मावळ कोर्टात भा.द.वी. 191,199,200 व लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 – अ अंतर्गत याचिका दाखल केली होती. यानुसार याचिकेत प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने न्यायालयाने पडताळणी करून दिनांक 4/10/ 2021 रोजी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 202 अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!