ताज्या घडामोडी

नॅशनल हेवी कंपनीतील कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आमदार सुनील शेळके प्रयत्नशील

तळेगाव : येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनी 2015 पासून आर्थिक अडचणीमुळे बंद आहे. कंपनीमध्ये काम करणार्‍या 300 कामगारांचे भवितव्य त्यामुळे अंधारात आहे. ही कंपनी पूर्ववत सुरू व्हावी. व यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके प्रयत्नशील असून त्यांनी यासंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली.

यावेळी शरद पवार यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबत संबंधित विभागाच्या बैठका घेण्याच्या सूचना केल्या.

तसेच मावळ तालुक्यातील पर्यटन विकास आराखडा संदर्भात बैठक घेण्याची सूचना पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केली.

यावेळी आमदार सुनील शेळके युनियन प्रतिनिधी मा. नगरसेवक आयुबभाई सिकिलकर, अमीर ऊर्फ बाबा मुलाणी, जमीर नालबंद उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!